थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

दिनविशेष : ३१ मे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती.

३१ मे  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती.
मराठवाड्यातील ‘ चौडी ‘ ( चापलगाव ) ता. जामखेड हे अहिल्याबाईचे जन्मगाव.
माणकोजी पाटील व सुशिलाबाई याना कृष्ण सप्तमी, सोमवारला कन्यारत्न झाले ( ३१ मे १७२५ )
त्यांचे नाव ‘ अहिल्या ‘ असे ठेवण्यात आले.पुढे मल्हारराव होलकर यांचे चिरंजीव खंडेराव यांचाशी १७३३ मधे त्यांचा विवाह झाला व त्या अहिल्याबाई होळकर झाल्या.
पण पति व पुत्रसुख त्याना जास्ती लाभले नाही. १७५४ ला पती खंडेराव , १७६७ ला पुत्र मालेराव व १७६६ ला सासरे मल्हारराव यांचा निधना नंतर सर्व जबाबदारी त्यांचावर येवून पडली व ती त्यानी समर्थपणे पेलली.
त्या जश्या कर्त्तव्यदक्ष होत्या तसेच दानशूर ही होत्या तसेच प्रजाहीतदक्ष, राजकारणधुरंधर, आदर्श राज्यकर्ती, समाजसुधारक व उत्तम नेत्तृत्वगुण ही त्यांचात होते. महादजी  शिन्द्यांच्या मदतीने उत्तरेतील राजकारण त्यानी उत्तमरीत्या  सांभाळले . तसेच हुंडा पद्धत, बाल विवाह, सती पद्धत व आनेक स्त्री शोषण  करणार्या गोष्टीना त्यांचा विरोध होता.
आयुष्यभर नियतीचे कठोर घाव सोसून, खडतर जीवन जगुन वयाचा ७० ला श्रवण वद्य चतुर्दशी १३ ऑग. १७९५ ला अहिल्याबाईनी देह सोडला.