Faltupana.in - मराठी मजेचे माहेरघर - आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे !!
Home » , » खरा तो एकची धर्म - साने गुरुजी

खरा तो एकची धर्म - साने गुरुजी
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
----------------------------------------------------
पांडुरंग सदाशिव साने
टोपणनाव: सानेगुरुजी
जन्म: डिसेंबर २४, इ.स. १८९९
पालगड, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: जून ११, इ.स. १९५०
के.इ.एम.रुग्णाल य मुंबई
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन: छात्रालय दैनिक, साधना, साप्ताहिक
प्रमुख स्मारके: वाडघर-गोरेगाव, माणगाव तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
धर्म: हिंदू
प्रभाव: महात्मा गांधी
वडील: सदाशिव
आई: यशोदाबाई
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यसैनि क, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठीसाहित्यिक होते


Share this article :

Post a Comment

www.faltupana.in वर आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

 
Support : Copyright © 2016. Faltupana.in - All Rights Reserved
Proudly powered by www.krimsoft.com