व्यंगचिञकार वॉल्ट डिस्ने याच्या आयुष्यातील ही गोष्ट आहे.... - Faltupana.in

Faltupana.in

Funny images, Jokes, Article, Marathi Graffiti. आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ..

Loading...

वाचकांची पसंद :

Post Top Ad

Post Top Ad

व्यंगचिञकार वॉल्ट डिस्ने याच्या आयुष्यातील ही गोष्ट आहे....उमेदवारीच्या काळात वृत्तपञाच्या संपादकाकडून त्याची चिञं साभार परत येत.
ते म्हणतं वॉल्ट डिस्नेजवळ प्रतिभा, सर्जनशीलता नाही.
एक दिवस चर्चमधील एका धर्मोपदेशकाने काही व्यंगचिञ काढण्यासाठी त्याला बोलावलं.
चर्चशेजारील उंदरांचा सुळसुळाट असलेल्या एका खोलीत डिस्ने काम करीत होता.
तेथील एक छोटा उंदीर खेळताना पाहून त्याला उंदरावर आधारित चिञमालिका तयार करण्याची प्रेरणा मिळाली;
हीच आज जगभर आबालवृद्धांना आवडणाऱ्‍या “मिकी माऊस” ची सुरुवात.
यशस्वी लोक हे काही अवाढव्य ,अचाट करीत नाहीत; तर ते साध्या साध्या गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने व्यवस्थित करतात.


Post Top Ad

Loading...