Loading...

थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

एकदा वाचाच : शेअर केल्याशिवाय राहणार नाही - एक अवलियाची कथा

 
जुन्या काळातील एक जबरदस्त पैलवान: पै. बापू बिरू वाटेगावकर (आप्पा) ....
(पै. बापू बिरू वाटेगावकर यांच्यावर  'कुस्ती-मल्लविद्या' ह्या फेसबूक पेजवर पै. गणेश (मिलिंद) मानुगडे यांनी लिहिलेला लेख)                                                                                                                                                                                                                                         
कृष्णाकाठचा फरारी, बोरगावाचा ढान्या वाघ अशा अनेक विशेषणांनी बापूंची ओळख साऱ्या महाराष्ट्राला असेलच. वाळवा तालुक्यातील बाहे बोरगाव हे बापूंचे गाव. याच गावात काही दशकापूर्वी रचला गेला एक रक्तरंजित क्रांतीचा इतिहास. गोर-गरीब जनतेवर गावातील गावगुंड अन्याय करत मुजोर होत जातात, गरिबांच्या लेकीसुना म्हणजे असल्या नाराधारामान्च्या भोगवस्तूच ! प्रचंड दह्षत, टवाळखोर गुंडांची टोळी याच्या बळावर बोरगावात गावगुंडानी घातलेले थैमान. जाब विचारणारा कोणी नव्हता. दाद मागायचे धाडस कोणात नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्याच गावच्या तांबड्या मातीत कुस्ती खेळणारा एक पैलवान पुढे सरसावला. बापू बिरू वाटेगावकर.…

  
तरुणांसोबत मनसोक्त गप्पा मारताना महाराष्ट्राचा ढाण्या वाघ - श्री. बापू बिरु वाटेगावकर 

ती तांबडी माती बंड शिकवते, त्यात अंग घुसळणाऱ्याला 'लढ' म्हणावे लागताच नाही. लांघ-लांगोटा बांधून तो पैलवान हातात कुऱ्हाड-भाले घेवून एकटा उठला आणि त्यान बोरगावला लागलेली गुंडांची किड कायमची संपवली. गावगुंडांची मुंडकी कुऱ्हाडीने उडवून हा बहादर फरार झाला. सह्याद्रीच्या कडेकपारीत लपून त्यानी अन्यायाविरुध्द लढा सुरु केला.  पोलिसांनी सातारा-सांगली जिल्हा पिंजून काढला, पण हे वारे कोणाच्याच हाती लागले नाही. जवळजवळ ३० वर्षे पोलिसांना गुंगारा देत बापू बिरू वास्तदानी बोरगाव पंचक्रोशीतील गुंडगिरी, सावकारी कायमची बंद केली. लेकी-सुनांचे नांदणे बसवले, कित्येकांची कर्जे मुक्त केली, कित्येकांच्या जमिनी सोडवून देवून हे मात्र पोलिसांपासून आयुष्यभर पळतच राहिले. मात्र एके दिवशी आपले सर्व कामे झाले असे समजून बापूनी पोलिसांसमोर बिनशर्थ शरणागटती पत्करली. भारतीय घटनेनुसार बापुंच्यावर कित्येक खुणांच्या मालिकेची गुन्हे दाखल केले आणि त्यांना 'जन्मठेपेची' शिक्षा सुनावली. आणि तो क्रांतीचा धगधगणारा यज्ञकुंड थांबला. अहो थांबला नाही तो तर त्यापासूनच पेटला...

'आम्ही धनगर' या श्री. मिलिंद डोंबाळे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना…

कायद्याने दिलेली शिक्षा भोगून बापू बिरू काही वर्षापूर्वी गावी परतले आहेत. आपले उर्वरित जीवन भजन कीर्तन आणि प्रवचनात व्यथित करत आहेत. आजही 'बापू बिरू वाटेगावकर' हे नाव जरी आमच्या पंचक्रोशीत घेतले तर गुंडांचे अंग कापू लागते. असे हे बापू बिरू वाटेगावकर गावासाठी अन्यायाविरुध्द आपले आयुष्य जेलमध्ये घालवून आता गावी आहेत. एक पैलवान मनात आणले तर काय करू शकतो त्याचे उदाहरण म्हणजे बापू होय. आजही बोरगावच्या यात्रेत बापू बिरू स्वतः  हजर असतात. चांगल्या पोराला खिशात असेल तेवढे पैसे बक्षीस देतात, त्यांच्या रूपाने ते त्यांच्या पैलवानकीचे दिवस आठवतात. कधी बोरगाव परिसरात आला तर बापू बिरू उर्फ आमचे आप्पा यांना जरूर भेटून दर्शन घेवून जा...

धन्यवाद                                                                                                                                                पै. साभार : गणेश (मिलिंदमानुगडे