Faltupana.in - मराठी मजेचे माहेरघर - आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे !!
Home » » मराठीतले काही शब्द पुण्यात फारच वेगळ्या अर्थाने उच्चारले जातात.

मराठीतले काही शब्द पुण्यात फारच वेगळ्या अर्थाने उच्चारले जातात.


मराठीतले काही शब्द पुण्यात  फारच  वेगळ्या अर्थाने उच्चारले  जातात.
अशा काही शब्दांची ही डिक्शनरी ( म्हणजेच  त्यांचा अर्थ काय आहे ते बघा )
1) यंत्रणा : जाडजूड मुलगी
2) दांडीयात्रा :  ऑफिसला सलग बुट्ट्या.
3) पेटणे : संतापणे
4) हुकलेला : मुद्दाच न  कळालेला.
5) चैतन्यकांडी : सिगारेट
6) चैतन्यचूर्ण : तंबाखू
7) चेपणे : पोट भरून दाबून जेवणे
8) डोळस : बॅटरी.
9) बॅटरी : चष्मेवाला/ चष्मेवाली.
10) डब्बल बॅटरी : जाड  भिंगांच्या चष्मेवाला/  ली
11) पुडी : तंबाखू, गुटखा.
12) पुडी सोडणे : थाप मारणे
13) खंबा : दारूची/  बीयरची फुल बॉटल
14) पेताड : बेवडा
15) डोलकर : दारू पिऊन  डोलणारा

16) वकार युनूस : दारू पिऊन  ओकाऱ्या करणारा
17) भागवत : इकडून तिकडून   उधाऱ्या करून  नडभागवणारा
18) सोपान : गावरान गडी
19) सांडला : पडला
20) जिवात जीव येणे : गरोदर  राहणे
21) फणस लावणे : नस्त्या कुशंका काढणे
22) आज बसायचे का? : आज  दारूची मैफल  जमवायची का?
23) कल्ला : धम्माल
24) बुंगाट : (वाहनासंदर्भात)  अतिशय वेगाने
25) गाडी : टू व्हीलर
26) थुक्का लावणे : फसवणे
27) टांगा पल्टी, घोडे फरार :  दारू पिऊन आउट  होणे
28) एलएलटीटी : लुकिंग लंडन,  टॉकिंग  टोकियो (तिरळा)
29) कर्नल थापा : थापाड्या माणूस
30) सत्संग : ओली पार्ट


Share this article :

+ comments + 4 comments

10 November 2012 at 05:22

ajun ek ahe TTMM tujh tu maz mi (chaha ghyala gelya var kinva ekhadi film baghayala gelyavar)

7 December 2012 at 08:56

ABCD......MHANJE AGA BAI CHADDI DISALI

7 December 2012 at 08:59

CHINA--->> Mhnaje chaddi...haravali...in...north...AMERIKA.

Post a Comment

www.faltupana.in वर आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

 
Support : Copyright © 2016. Faltupana.in - All Rights Reserved
Proudly powered by www.krimsoft.com