Faltupana.in - मराठी मजेचे माहेरघर - आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे !!
Latest Post

THE REAL NAME OF BOLLYWOOD STAR:




Aamir Khan – Aamir Hussain Khan
Ajay Devgan – Vishal Devgan
Ajit – Hamid Ali Khan
Akshay Kumar – Rajiv Bhatia
Amitabh Bachchan – Amit Srivastav
Ashok Kumar – Kumud Ganguly
Bobby Deol – Vijay Singh Deol
Dev Anand – Devdutt Pishorimal Anand
Dharmendra – Dharam Singh Deol
Dilip Kumar – Yusuf Khan
Govinda – Govinda Arun Ahuja
Jeetendra – Ravi Kapoor
Sega- Juber khan
John Abraham – Farhan Abraham
Johnny Lever – Badruddin Qazi
Kamal Haasan- Alwarpettai Aandavar
Kumar Gaurav – Manoj Tulli
Lucky Ali – Maqsood MehmoodAli
Madhubala – Mumtaz Jehan Begum Dehlavi
Mahima Chaudhry – Ritu Chaudhry
Mallika Sherawat – Reema Lamba
Manoj Kumar – Hare Krishna Goswami
Nana Patekar – Vishwanath Patekar
Raj Kumar – Kulbushan Pandit
Rajesh Khanna – Jatin Khanna
Rajnikant – Sivaji Rao Gaekwad
Rekha – Bhanurekha Ganesan
Salman Khan- Abdul Rashid Salim Salman Khan
Sanjeev Kumar – Haribhai Jarivala
Shammi Kapoor – Shamsher Raj Kapoor
Shashi Kapoor – Balbirraj Kapoor
Sunil Dutt – Balraj Dutt
Sunny Deol – Ajay Singh Deol
Tuntun : Uma Devi Khatri

सुपरस्टार रजनीकांत काय काय करू शकतो ? बघा बरे




•रजनीकांत ज्यावेळी पुशअप्स मारतो, त्यावेळी तो स्वत:ला वर उचलत नाही, तर पृथ्वीला
खाली ढकलत असतो

•मोनालिसाच्या ज्या हास्याबद्दल जगभरात अजूनही गूढ आणि आकर्षण आहे, हे हास्य
साक्षात रजनीकांतनेच तिला दिलंय

•रजनीकांत कुठल्याही संख्येला शून्याने भागू शकतो

•रजनीकांत माशालाही पाण्यात बुडवून मारू शकतो

•रजनीकांतने एकदा एका घोडय़ाच्या हनुवटीला लाथ मारली होती. आज त्याच्या वारशांना
आपण जिराफ म्हणून ओळखतो

•रजनीकांतने एकदा मॅकडोनाल्डमध्ये इडलीची ऑर्डर दिली आणि.. त्याला ती मिळाली!

•बम्र्युडा ट्रँगल म्हणून ओळखला जाणारा भाग पूर्वी बम्र्युडा स्क्वेअर होता; पण
रजनीकांतने एका कोप-याला लाथ मारली आणि..रजनीकांत कॉर्डलेस फोनने तुमच्या
गळ्याभोवती फास आवळून तुमचा जीव घेऊ शकतो

•रजनीकांत श्वास घेत नाही. आसमंतातली हवा संरक्षणासाठी त्याच्या फुफ्फुसांमध्ये
लपून बसलेली असते

•रजनीकांत यापूर्वीच मंगळावर जाऊन आलाय; म्हणून तर तिथे सजीवसृष्टीचं अस्तित्व नाही

•रजनीकांत रोखून पाहतो, तेव्हा पाणी अधिक वेगाने तापतं

•गुगलवर रजनीकांतला शोधण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. कारण कोणीच रजनीकांतला शोधू
शकत नाही; रजनीकांतच आपल्याला शोधून काढतो

•टेलिफोनच्या आन्सरिंग मशिनचा बीप वाजण्याआधीच रजनीकांत तिथे आपला संदेश नोंदवू
शकतो

• रजनीकांत न्यायालयात जातो आणि.. न्यायाधीशालाच शिक्षा सुनावून येतो

• रजनीकांतला लहानपणी देवी झाल्या होत्या. म्हणूनच आज देवीचं नामोनिशाण दिसत नाही

• रजनीकांतच्या कॅलेंडरमध्ये 31 मार्चनंतर एकदम 2 एप्रिलच येतो कारण.. त्याला
कोणीही 'एप्रिल फूल' बनवू शकत नाही

• रजनीकांत घडय़ाळ घालत नाही कारण.. किती वाजलेत ते तोच तर ठरवतो

• मृत्यूला कोणीही फसवू शकत नाही, हे विधान म्हणजे रजनीकांतला स्वत:चा अपमानच
वाटतं. कारण तो क्षणोक्षणी मृत्यूला फसवत असतो

• पुरातत्त्ववेत्यांनी 1236 सालची एक इंग्लिश डिक्शनरी शोधून काढली. त्यात
'व्हिक्टिम' या शब्दाचा अर्थ 'ज्याचा रजनीकांतशी सामना झाला आहे तो' असा आहे

• ग्लोबल वॉर्मिग नावाची काही गोष्टच अस्तित्वात नाही. रजनीकांतला थंडी वाजत होती,
म्हणून त्याने सूर्याला थोडं पृथ्वीच्या जवळ आणलं
yanna Raskala...... माईंड इट!!!!!

कहर असा पुणेरी दुकानदार प्रियकर - Pune Love



‎"एका तरुण आणि पक्का पुणेरी असलेल्या(म्हणजे ­?) दुकानदाराचे एका मुलीशी प्रेम जमले. पण त्याने त्याच्या प्रेयसीला पुढील अटींचे पालन करण्याची कडक सूचना केली:
१. दुकानात सारखे सारखे येवू नये
२. सारखा सारखा फोन करू नये
३. मिसकॉल देवू नये. मिसकॉल दिल्यास माझ्याकडून फोन येण्याची अपेक्षा ठेवू नये.
४. फोनवर अथवा प्रत्यक्षात बोलताना आपले म्हणणे थोडक्यात मांडावे, उगीच पाल्हाळ लावू नये. प्रेम व्यक्त करायला दोन शब्द पुरेसे असतात. अबोल प्रेम तर फारच चांगले.
५. दुपारी २ ते ४ या वेळेत फोन करू नये.माझी वामकुक्षीची वेळ असते. झोपमोड झाल्यास आपल्या संबंधात बिघाड निर्माण होवू शकतो.


६. आमच्याकडे पाणी देण्याची पद्धत नाही, तेंव्हा दुकानात आल्यावर पाणी मागू नये
७. सुट्टीच्या दिवशी आपण फिरायला व जेवायला बाहेर एकत्र जावू शकतो, पण खर्च TTMM (तुझा तू माझा मी ) करावा लागेल.
८. वरील अटी मान्य असतील तरच पुढील वाटचाल करावी.

गम्मत म्हणजे या अटी वाचून त्या मुलीस तो दुकानदार आणखीनच आवडायला लागला, कारण "तीही पक्की पुणेकर होती"

लोकांनी विचारलेले फालतू प्रश्न आणि त्याला दिलेले हटके उत्तर







अनेकदा लोकं असे प्रश्न विचारतात जे अतिशय मुर्खपणाचे असतात...
अशा प्रश्नांना दिलेली ही हटके उत्तर आहेत. पहा काही मस्त नमुने दिले आहेत:-

▶1) हॉटेल मध्ये अनेक जण वेटरला'इथे जेवण कसं मिळतं'हे विचारतात....
आता तो काय वाईट मिळत म्हणून सांगणार ? तरी असलाचएखादा
... इरसाल वेटर तर....गिर्हाईक: इथे पनीर मसाला चांगला मिळतो का हो ?

वेटर: छे !! बांधकामावरच सिमेंट आणुन कालवतो ते आम्ही त्यात...
कसला चांगला लागतोय................

▶2) प्रश्न- अरे वा! घरीच आहातवाटतं?
उत्तर- नाही माझ्या पश्चात ही इमारत"राष्ट्रिय वास्तु"घोषित झाली तर कसे वाटेल हे बघायला आलोय...............



▶3) सकाळी.प्रश्न - पेपर वाचताय वाटतं!
उत्तर- नाही! ओल्या शाईचा (इंक) वास घेतल्या शिवाय मला ताजेतवाने वाटत नाही......

▶4) सिनेमागृहा बाहेर प्रश्न:काय पिक्चर बघायला आलात वाटतं?
उत्तर: छे! फावल्या वेळात तिकिटे"ब्लैक" करुन अर्थार्जन करावं म्हणतोय! पण!
इथेही तुम्ही आमच्या"आधी"हजर! !............

▶5) सकाळी फिरायला निघाला आहात प्रश्न: काय"मोर्निंग वाक्"वाटतं??!!!
उत्तर: काही तरी काय! नगरपालिकेचं कंत्राट घेतलयमैलाचे दगड कुणी पहाटे
चोरून तर नेत नाही ना याची खात्री करतोय!!.............

▶6) प्रश्न- प्रवासाला निघालात वाटतं? (हातात लगेजबघून !!!!)
उत्तर- नाही हल्ली व्यायाम करायला सवड मिळत नाही ना!
शिवाय जिम चे पैसे ही वाचतात !!

“प्रपोज केल्यानंतर ” मुलीकडून साधारणता “कोणती उत्तरे”मिळू शकतात त्याबद्दल काही….




{"type":1,"tn":"K"}">
१. नाही SSSSSSS

२. शी………!!!!!! किती घाणेरडे
विचार आहेत तुझे ?

३. मी तर तुला ‘तसल्या नजरेने’ पाहिलेच… नाही … मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] मित्र मानते …

४. मी “ऑलरेडी एंगेज” आहे.

५. प्लीज, माझा असल्या”फालतू गोष्टींवर” विश्वास
नाही. माझ्यासाठी माझे ‘शिक्षण, करियर व कुटुंबिय’
महत्त्वाचे आहेत….

६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे
कदाचित “आकर्षण” असावे …

७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?

८. मागच्या वर्षीच तर मी तुला “राखी” बांधली होती !!!!

९. माझी अशा गोष्टींसाठ ी अजून ‘मानसीक तयारी’ झाली नाही ….

१०. मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ….

११. मुर्ख माणसा….. …..,एवढी छोटीशी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?

१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ….

१३. सॉरी ….

१४.”आरश्या त तोंड बघ मेल्या … म्हणे तू मला आवडतेस !!!”

१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ] १६. होय, मला पण तू आवडतोस ,पण तू
माझा विश्वासघात करणार नाहिस ना ?

१७. गाढवा, आधिच नाहीस का सांगायचं, आता वेळ निघून गेली [ म्हणजे दुसरे कोणतेतरी चांगले "गाढव" सापडले ]

१८. तु जर थोडे आधी सांगितले असते तर मी कदाचित विचार केला असता ….

१९. नालायका , तुझी हिंम्मतकशी झाली मला असे विचारायची ?” [ त्यानंतर कदाचित एक छानशी कानफाडीत ...]

२०. ती : मला विचार करायला वेळ हवा आहे … तो :नक्की किती ? [ अजून आशा आहे तर ....] ती : ७ जन्म ….
[ यानंतर मुलगा बेशुद्ध ...]

२१. नीच माणसा….. …………….तुझी हिंम्मत कशी झाली मला असे विचारायची ?”

२२. सॉरी , माझे तुझ्या मित्रावर / छोट्या भावावर प्रेम आहे ….

२३. हा हा….हा हा हा…. हा हाहा हाही ही … ही ही ही … ही ही ही ही

२४. लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतू गोष्टीत गुंतण्याचा विचारनाही….



२५. मातीत जा … मला त्याची पर्वा नाही ….

२६. तु माझ्यासाठी काय करू शकशील ?

२७. मी कितवी आहे? हा हा हा….

२८. मी तुझ्याबद्द ल “तसला विचार’ कधी केलाच नाही …

२९. माझ्या भावाला भेट, तो तुला व्यवस्थित समजावून सांगेल….

३०. का ??? “स्वाती” नाही म्हणली का?

३१. पण तू तर “सपनाच्या” मागे होतास , तिने काय थप्पड वगैरे मारली का ?

३२. किती दिवसांकरता ? सॉरी किती तासांकरता ?

३३. “जे काही बोलायचे आहे ते लवकर बोलुन टाक, माझी जाण्याची वेळ झाली आहे…”

३४. कित्तीSSSS छान ….

३५. पुढच्या ४ महिन्यांची ‘वेटिंग लिस्ट ‘ पण फुल्ल आहे …

३६. क्काय SSSSS

३७. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहितर ….

३८. मला वाटतयं कदाचित मी”एंगेज” असेन …

३९. माझ्याकडे तुझ्यापेक् षा जास्त चांगले “ऑप्शन” आहेत…

४०. मला ह्या गोष्टीबद्द ल काहिएक बोलायची इच्छा नाही. त्यानंतर ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागते …..

४१. माझ्या “बॉयफ्रेंड ला” कळले तर तुला त्रास होईल कारण तो खूप तापट आहे …

४२. खरेतर माझ्या ‘चुलत बहिणीला’ तू खूप आवडतोस म्हणून मग …..

४३. माझ्या आईला तुझे वागणे, बोलणे, चालणे आवडणार नाही ………

४४. नाईस जोक …

४५. सन्नकन एक कानाखाली [ शब्दापेक्ष ा कृती अधिक बोलकी ...]

४६. हाहाहा … मला वाटलं नव्हत की तू येवढा चालू निघशीलं …..

४७. “काय पाहिलसं माझ्यात?????”


चालू बाई भोला हवालदार - मराठी ठसका




एकदा एक बाई पोलिस स्टेशन मध्ये कम्प्लेट करायला जाते.

बाई : अहो साहेब माझा नवरा हरवला आहे हो..
(एवढ बोलून बाई रडायला लागते)

पोलिस : त्यांची उंची काय आहे ?

बाई : नाही हो माहिती नाही कधी मोजली नाही.

पोलिस : बर.. काटकुळे आहेत कि जाडे आहेत ?



बाई : जाडे ? काटकुळे ? नाही हो ते सुद्धा माहिती नाही ...

पोलिस : बर डोळ्यांचा कलर काय आहे ?

बाई : नाही हो खरच नाही माहिती ..

पोलिस : बर डोक्याच्या केसांचा कलर ?

बाई : कलर नेहेमी बदलत असतो हो आत्ताचा नाही माहिती ..

पोलिस : त्यांनी कोणती कपडे घातली आहेत हे ?

बाई : काही माहिती नाही हो... पण कृपा करून शोधा त्यांना

पोलिस : अहो बाई बर मला सांगा त्यांच्या बरोबर अजून कोणी होत का ?

बाई : हो आहे ना माझा कुत्रा आहे त्यांच्या सोबत. कलर पांढरा त्यावर काळे
ठिपके आहेत. डोळे अगदी काळे काळे आहेत. डोळ्यांच्या माध्येभागी कि
नाही एक लाल असा ठिपका आहे हो, गळ्यात चोकलेटी पट्टा आह.
आणि एक कि नाही तो भुंकत नाही हो कोणावर.
त्याची उंची कि नाही जेमतेम उभी मोजली तर १ फुट आणि अडवा ३फुट आहे.
त्याला नॉन वेज खूप आवडत, तस आम्ही सोबतच जेवत असतो हो.
एवढ बोलून ती बाई अजून रडायला लागते.

पोलिस (डोळ्यात आसव आणून ) : हवालदार तोंडे पहिलं त्या कुत्र्याला शोधा


आठवीतील मुलाने त्याच्या गर्लफ्रेँन्डसाठी लिहलेले लव्ह लेटर Love Letter






प्रिय. निशा. . . . .
.
लव्ह लेटर पाठवण्यास
कारण
की ?
.
मला तु खुप आवडतेस..
तु पण माझ्याकडे सारखी बघत
असतेस..
.
म्हणुन मला वाटतंय,
मी पण तुला आवडतो..
.
मी जर तुला आवडत असेन
तर,
मला गणिताच्या पेपरला मदत कर..
.
तु डोक्यात लाल रिबीन लावत नको
जाऊ,
तुझ्या मागं मंदाकिनी बसते
ना..
.
ती तुझ्या रिबीन वर पेनची शाई
सोडते,
मला तिचा खुप राग येतो..
.
ती माझ्या घराशेजारीचं राहते,
शाईचा बदला घ्यायचा
म्हणुन
मी..
.
तिच्या घराची बेल वाजवुन पळुन
जातो..
.
तु फेअर अँन्ड लव्हली लावत
जा,
आणखी गोरी होशील..
.
तुझ्या शेजारी बसणारी शीतल
आणि सोनाली दोघीही,
तुझ्यापेक्षा जास्त गो-या
आहेत..
.
पण त्या मला आवडत नाही..
पत्राचा राग आल्यास मला परत दे..
.
सरांना देऊ नकोस......

तुझा प्रियकर...:p:p:p बंड्या


खान्देशी अहिराणी नवरा बायको तडका





नवरा: आज खावाले काय बनाडस ?
बायको: तुम्ही सांगश्यात ते.
नवरा: खिचडी बनाड.
बायको: रातनी अजून पडेल शे.
नवरा: मंग बट्ट बनाड
बायको: पोऱ्या तोंड नाही लावस
नवरा: बोंबील शेत का ?
बायको: सोमवार न इसड नको
नवरा: वरण चीकल्या बनाडस
बायको: रात ना खातस का काही भी


नवरा: नाहीतर मंग उडीद नि दाय बनाडस
बायको: तुमन पोट गरबा धरस
नवरा: कडी बनाडस
बायको: दही नही शे
नवरा: मंग काय बनाडस ?
बायको: तुम्ही सांगश्यात ते.

कॉल सेंटर आणि भयानक ग्राहक



उम्म्या कॉल सेंटर ला फोन करतो..
कॉल सेंटर - मी आपल्याला कश्या प्रकारे मदत करू शकतो?
उम्म्या - मी नोट पॅड वर टाईप करत होतो..अचानक सगळे
शब्द गायब झाले.. 

कॉल सेंटर - गायब झाले?
उम्म्या - हो..मी आता काहीही टाईप केलं तर ते स्क्रीन वर उमटत नाहीये..
कॉल सेंटर - तुम्ही नक्की नोट पॅड वर आहात की त्याच्या बाहेर आलात..
उम्म्या - माहित नाही..


कॉल सेंटर - बरं...तुम्हाला 'C ' प्रोम्प्ट दिसतोय का..
उम्म्या - 'C ' प्रोम्प्ट म्हणजे?

कॉल सेंटर - बरं..मला सांगा तुम्हाला कर्सर दिसतोय का स्क्रीन वर..
उम्म्या - अहो काहीच दिसत नाहीये..तेच तर सांगतोय कधीचं...

कॉल सेंटर - तुमचा मॉनिटर चालू आहे की बंद?
उम्म्या - मॉनिटर म्हणजे काय?

कॉल सेंटर - तुमच्या टेबल वर T .V सारखा जो डब्बा आहे तो..
उम्म्या - ते कसं ओळखू ? 

कॉल सेंटर - मॉनिटर च्या मागे पॉवर केबल आहे का कनेक्ट केलेली? आणि मॉनिटर
चा लाईट लागतो का?
उम्म्या - पॉवर केबल लावलेली आहे..पण लाईट नाही लागत आहे..


कॉल सेंटर - बरं..मॉनिटर च्या मागची दुसरी केबल तुमच्या कम्प्युटर ला जोडलेली आहे का?
उम्म्या -मला नाही दिसत..
कॉल सेंटर - म्हणजे ?
उम्म्या - अहो इथे अंधार आहे..फक्त खिडकीचा प्रकाश येतोय..
कॉल सेंटर - मग लाईट चालू करा ना..
उम्म्या - अहो..लाईट गेलीये कधीपासून....

कॉल सेंटर - ओह !!
मला आता कळाला प्रॉबलेम...एक काम करा..तुमचा कम्प्युटर पैक करा...आणि जिथून
आणलाय त्याला परत द्या..
उम्म्या - का हो काय झालं? आणि त्यांना काय सांगू परत देताना?
कॉल सेंटर - सांगा की मी कॉम्प्युटर घेण्याच्या लायकीचा नाहीये..
मला अक्कल आली की परत घेईन........


या जगातील १० सत्य




1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हाबायका एकमेकींच्या साड्यादागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंतअसतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो !!





सुविचार
१. पैसा हेच सर्वस्वनव्हे... ­ ... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!
२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!!
३. पाणी वाचवा...... बीअरप्या!!!
४. शेजाऱ्यावर प्रेमकरा......पकडले जाऊ नका म्हणजे झालं!!! :p


काही मजेशीर व्याख्या


अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखीहोतो
शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्यागोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फॅशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका



पासबुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव
गॅलरी - मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचागळा कापण्याचे साधन
छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती - दोन महायुद्धांच्यामधला काळ
दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव


नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचाबदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन - नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा - चालतं बोलतं ATM कार्ड
श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एकसाधन
चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारीसाखर
लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना


दुबईतील बस पेक्षा भारतीय बसच श्रेष्ठ !





१) दुबईतील बस पेक्षा भारतातील बस उंचीने मोठी आहे.

२) प्रवाश्याला थुंकता यावं म्हणुन खिडक्यापण उघडता येतात.

३) भारतातील बस मधे "लाल आणि पिवळा" असे दोन रंग वापरले आहेत तर दुबईच्या बस मधे केवळ एकच काळाकुट्ट रंग वापरलाय.


४) दुबईतील बस एखाद्या अळीप्रमाणे दिसते तर भारतातील बस बघुन ’हे एक बस’ आहे अस कोणीपण म्हणु शकेन.

आणखी काय काय दिसतय तुम्हाला.. कमेंट मधे लिहा...! 


जाहिरातीसाठी संपर्क

Contact : faltupana.in@gmail.com

 
Support : Copyright © 2011. Faltupana.in - All Rights Reserved
Proudly powered by Bonless.in