थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

पुणेकरांच्या सवयीवरचे काही इरसाल विनोद - दे धम्माल !!


एकदा एक मुलगा टाइमपास
काहीतरी म्हणून
गुगल वर how to get free lunch in 5
star hotel सर्च करत होता..
.
गुगल नि रिजल्ट दिला..
. .
काय पुणेकर का.???
_____________________________________________
पुणेकर एक पोपट पाळतात.
पोपट रोज सकाळी-सकाळी मालकाला ऊठवतो.
पोपट -ऊठा मालक कामाला जायचय ना?
पूणेकरांना पोपटाचा फार अभिमान वाटतो.
काही दिवसांनी पूणेकरांची बदली साेलापूरला होते.
पोपट -ऊठ कि बे झागिरदार...
कामाला कोण तुझा बाप जाणार का कडू?
_____________________________________________
आज  एका पोलिस वाल्याने मला थांबवलं
कारण  हेलमेट घातल नव्हत....
पोलिसा ने  गाड़ी ची चावी काढून घेतली..
आणि म्हटले,
ये माझ्या मागे-मागे'
,.
आम्ही तर पुणेकर  मग काय ?
.
आम्ही खिशातुन  दूसरी चावी
काढली ,
गाड़ी स्टार्ट केली  आणि म्हटलो,
आता तू ये आमच्या मागे-
_____________________________________________
खडूस पुणेकर
आम्ही छत्री का घ्यायची?
पुण्यात पाऊस 28 इंच पडतो.
तो देखील 4 महिन्यात.
महिन्याचा झाला 7 इंच.
अर्धा रात्री पडतो, 12 तासात उरला 3.5 इंच.
दुपारी 3 तास (1 ते 4) आम्ही झोपतो. उरला 0.88 इंच.
एवढ्या टीचभर पावसासाठी ....
आम्ही छत्री का घ्यायची?
_____________________________________________
punekar mumbaikar jokes
मुंबईकर:- काय करता आपण?
पुणेकर:- बिझिनेस आहे माझा!
मुंबईकर:- कसला बिझिनेस आहे आपला?
पुणेकर:-सेलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड मेन्यूअल गारमेंट होल्डिंग डीवाईसेस!!
मुंबईकर:- वा वा ! म्हणजे काय?
पुणेकर:- पायजम्याचे नाडे विकतो मी!
_____________________________________________
एकदम खतरनाक पुणेकर
पुणेरीपणा म्हणजे काय हे शिकण्यासाठी एक माणूस पुण्याला गोखले यांच्याकडे आला.
गोखले दारातच उभे होते. त्यांच्यातील संवाद :
माणूस:-तुम्ही हा जो पायजमा घातला आहे तो किती दिवस वापरणार ?
गोखले:-एक वर्ष !
माणूस:- त्यानंतर फेकून देणार ?
गोखले:- नाही ! त्यानंतर आमची सौ त्याच्या हाफ चड्ड्या बनविते.
माणूस:- त्या तुम्ही किती दिवस वापरता ?
गोखले:-  अन्दाजे एक वर्ष.
माणूस:- मग ?
गोखले:-  त्यानंतर त्याची आम्ही पिलोकव्हर बनवितो. ती साधारण सहा महीने वापरता येतात.
माणूस:-   मग ?
गोखले:-   मग त्या फाटलेल्या कव्हरचा उपयोग मी सायकल पुसायला करतो.
माणूस:-  मग ते तुकडे टाकून देता ?
गोखले:-  नाही ! त्यानंतर सायकलची चेन किंवा अन्य तेलकट भाग पुसायला आम्ही ते तुकडे वापरतो, अन्दाजे सहा महीने पुरतात.
माणूस:- त्यानंतर तरी ते मळकट तुकडे तुम्ही टाकून देता की नाही ?
गोखले:- नाही ! त्याचा आम्ही काकडा करतो आणि चूल पेटवण्यासाठी वापरतो.
माणूस:- म्हणजे त्याची राखाडी होईपर्यंत तुम्ही ह्या पायजम्याची साथ सोडत नाही ?
गोखले:- ती राखाडीही आम्ही भांडी घासायला वापरतो.
त्या माणसाने गोखल्यांच्या चरणांना स्पर्श केला 
_____________________________________________
काल एक नविन पुणेरी पाटी
वाचून बेशुध्द पडता पडता वाचली ...!!
"आमच्या येथे 13व्या चा स्वयंपाक करून मिळेल..!"
पण..!
१५ दिवस आधी ऑर्डर नोंदविणे आवश्यक
_____________________________________________
पुणेरी मेडिकल दुकानातील पाटी...
आम्हाला  आमच्या कडील सर्व औषधांची एक्स्पायरी डेट माहित आहे,....
पण तुमची माहीत नाही.,,,,
तेव्हा कृपया उधार मागू नये.

 स्थळ : सदाशिव पेठ
एक *वयस्कर* गृहस्थ विचारत होते  ...
इथे आधार कार्ड कुठे काढून मिळतं...???
तर मिळालेलं उत्तर:
कशाला थोडक्यासाठी काढताय आता ????????

अमेरिकन : आमच्या देशात सगळे लोक उजवीकडून गाड्या चालवतात.
तुमच्या कडे काय पद्धत आहे?

पुणेकर : तसं काय फिक्स नसतं, म्हणजे समोरचा कुठून तडफडतो त्याच्यावर आहे..