आचार्य अत्रे ह्यांचे १ से एक किस्से - Acharya Atre - Faltupana.in

Faltupana.in

Funny images, Jokes, Article, Marathi Graffiti. आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ..

Loading...

वाचकांची पसंद :

Post Top Ad

Post Top Ad

आचार्य अत्रे ह्यांचे १ से एक किस्से - Acharya Atreएकदा अत्रे रेलवे रूला शेजारून चालले असतात !त्यांच्या शेजारून कोलेज ची
मुले चालली असतात !
त्यातला एक मुलगा अत्रे याना सतवायाचे थरावातो ! तो अत्रे ना विचारतो हे
काय आहे? (रुळ दाखवून )
अत्रे : रुळ आहेत !
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : लाकडी स्लिप्पर आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : खडी आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : माती आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : मुरुम आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : माझा बाप आहे .
मुलगा विचार करतो अत्रे आता चिडले आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : तुझी आई आहे .
मुलगा लगेच तिथून सतकतो

--------------------------------------------------------------
हौशी नाटकांच्या प्रयोगाबिषयी बोलताना आचार्य अत्रे भाषणात म्हणाले, "नाटकाच्या तालमी करायच्या नाहीत अन आयत्या वेळी कशीतरी वेळ मारून नेली म्हणजे स्वतःला कृतकृत्य मानायचे हे हौशी नाटकवाल्यांचे एक ठराविक तंत्र होऊन बसले आहे. नाटक बसवायचे म्हणजे वाच्यार्थ्याने अक्षरशः ते खाली बसवूनच दाखवतात." पुढे ते म्हणाले, "अशाच एका हौशी नाटकाच्या प्रयोगाला गेलो असता सर्वात कोणाचे काम चांगले झाले असे सांगण्याची माझ्यावर वेळ आली, तेव्हा प्रॉम्पटरचे काम सर्वान चांगले झाले, असे सांगणे मला भाग पडले..."
--------------------------------------------------------------
एकदा आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते; मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ विरोधकांपेक्षा बरेच जास्त होते. अत्रे मात्र एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवीत असत.
एकदा अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असताना पत्रकारांनी त्यांना छेडले. “अत्रेसाहेब, तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता खरे; पण त्यांच्या एवढ्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार?”
बाजुला वळून अत्र्यांनी ज्याच्या शेताला भेट द्यायला ते आले होते त्या मालकाला विचारले, “बळवंतराव, कोंबड्या पाळता की नाही?”
“व्हय तर!”
“किती कोंबड्या आहेत?”
“चांगल्या शंभरएक कोंबड्या हायेत की!”
“आणि कोंबडे किती?”
“कोंबडा फक्त एकच हाये.”
”एकटा पुरतो ना?”
उपस्थितांमध्ये प्रचंड हशा उसळला आणि सर्व पत्रकारही त्या हशांत सामील झाले.

--------------------------------------------------------------
१९६५ सालची गोष्ट असावी. नक्की मला आठवत नाही.सांगली मध्ये अत्रे यांचे भाषण होते गावभागात.मी नुकताच खेड्यातून य़ा शहरात आलो होतो,त्यामुळे अत्र्यांच्या भाषणास जायचेच असं ठरवून च सभेस गेलो होतो.दूर अंतरावर उभे राहून त्यांचे भाषण ऐकत होतो.एवढ्यात गर्दीतून “अत्रेसाहेब खिशातला हात काढा” असा आवाज ऐकू आला. अत्र्य़ाना खिशात हात घालून बोलण्याची संवय असावी.पण अत्रे महोदयानी शान्तपणे उत्तर दिले कि “तुमच्या मनात जे आहे ते माझ्या हातात नाही”गर्दीतून प्रचंड हशा नि टाळ्या पडल्या आणि अत्र्यांचे भाषण शांतपणे तसेच पुढे चालू राहिले.

Post Top Ad

Loading...