Faltupana.in - मराठी मजेचे माहेरघर - आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे !!
Home » » ◀◀◀◀ सर्वसामान्य माणूस ▶▶▶▶

◀◀◀◀ सर्वसामान्य माणूस ▶▶▶▶


सुख शोधणारा.... पण नशीब साथीला नाही म्हणून.... छोट्या छोट्या गोष्टीत सुख मानणारा.... ...

१)आज बसमध्ये/ ट्रेनमध्ये खिडकी कडची सीट मिळाली
२)अरे,आज ट्राफिक नव्हतं....
३)आज भाजीवाल्याने १ रुपया कमी घेतला...५ ची जुडी ४ लाच दिली.

४)आज ट्रेनला गर्दी नव्हती.
५)आज रस्त्यात फेरीवाले नव्हते.
६)आज strike नाही झाला कोणताच.
७)आज नळाला पाणी आले.....आणि ते पण खूप...
८)आज दिवसभरात एकदा पण लाईट नाही गेली
९)आज दुधवाला वेळेवर आला.
१०)आज ७:३० ची ट्रेन डॉट टाईमवर आली.
रात्री थकून जमिनीवर पाठ टेकवणारा सर्वसामान्य माणूस....
१)Mall मध्ये फक्त फिरायला जाणारा...आणि किंमती पाहून हताश होणारा...
२)हॉटेल चे मेनू कार्ड उजव्या बाजूच्या किमती पासून वाचायला सुरुवात करणारा आणि शेवटी वडापाव 7RS /- वर येऊन थांबणारा
३)दिवाळी,गणपती खूप साजरे करण्याची इच्छा असणारा पण.... सण संपल्यावर खाली होणाऱ्या खिश्याचे Tension असणारा... .
४)२ रुपयाची कटिंग चहा पण आनंदाने पिणारा....
¦¦¦¦¦¦एक एकटा एकटाच.¦¦¦¦¦¦ सर्वसामान्य माणूस.... आणि अंथरुणात पडल्यावर दिवसभराच्या खर्चाचे आणि दु:खांचा हिशोब करणारा सर्वसामान्य माणूस.... "सर्वसामान्य माणूस....सर्वसामान्य असून हि असामान्य असा सर्वसामान्य माणूस....!
Share this article :

Post a Comment

www.faltupana.in वर आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

 
Support : Copyright © 2016. Faltupana.in - All Rights Reserved
Proudly powered by www.krimsoft.com