Faltupana.in - मराठी मजेचे माहेरघर - आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे !!
Home » » निबंध लिहा - रावण

निबंध लिहा - रावणरावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे.
रावण १०-१० टोप्या घालायचा. 
शिवाय एकाच वेळेला १० प्रकारच्या मुखशुद्धी पावडरी पण खायचा.
लहानपणी रावणाच्या आईला त्याच्या नक्की कुठल्या तोंडात भडकावुन द्यायची हा प्रश्न असायचा.
कुठच्याही साध्या म्युझिकसिस्टिमवर गाणं लावलं तरी रावणाला ते डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड ऐकू यायचं.
रावण कधीच कुशीवर झोपू शकायचा नाही.
रावणाला कधीच टी शर्ट घालता आला नाही.
रावण एका तोडांने पान खायचा व सर्व तोंडे लाल व्ह्यायची.करण ती ईंटरकनेक्टेड होती अशी माहीती एका गाईडने सांगितली होती.
रावण दहा सिगारेटचे एक पाकिट एकदम संपवत असे.
रावण सलून मध्ये गेला कि न्हाव्याला त्याचे काम दिवसभर पुरत असे.
आणि सर्वात महत्वाचे रावण हा "पायाळु" होता.


मंदोदरी कपाळावर दहा कूंकवाचे ठिपके लावीत होती.
रावण एकटाच समूह गीत म्हणायचा.
रावण एकटाच लंकन आयडॉल मध्ये भाग घ्यायचा आणि महाफायनलचा महाविजेता व्हायचा.
होळीला रावण एकटाच दहा वेगवेगळ्या स्टाईल्नं बोंबलायचा.
रावणाच्या लग्नात मंदोदरीच्या वडिलानी 10 हारांची ऑर्डर नोंदवली होती.
रावणाला ढेकर आली की त्याला कुठल्या तोंडाने बाहेर काढावी हे समजत नसे.
रावण एक्टाच ग्रुप डिस्कशन करत असे.
रावणाला दहा ब्रान्डच्या सिगारेट लागायच्या
Share this article :

Post a Comment

www.faltupana.in वर आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

 
Support : Copyright © 2016. Faltupana.in - All Rights Reserved
Proudly powered by www.krimsoft.com