थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

काही अनुत्तरीत प्रश्न : ज्यांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे

ketaki chitale Age Wallpaper



१] मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्लिश पेपर पेक्षा कमी का ?
२] एशियाड मधील प्रवासी एसटीतल्या प्रवाशांकडे कुत्सित नजरेने का बघतात ?
३] तांबडा सिग्नल असतानाही आपल्या मागचा वाहचालक होर्न का वाजवतो ?
४] लहान बाळांशी मोठी लोकं बोबडे का बोलतात ?
५] उडप्याच्या हॉटेलमध्ये कांदा भाजी का मिळत नाही ?
६] बशीत ओतून चहा पिणाऱ्या माणसाला वेडा असल्यासारखे का पाहतात ?
७] मीच म्हणून तुमच्याशी संसार केला असे प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला का म्हणते ?


८] आपण हॉटेलात बसल्यावर तिथला पोरगा नेमकी आपल्या बाकाखालची फरशी पुसायला का येतो ?
९] हॉटेलात इडली संसारातली शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची ?
१०] अज्ञानात सुख असते असे म्हणतात मग माणूस ज्ञान मिळवण्यासाठी का धडपडतो ?
११] कॉम्पुटर बंद करण्यासाठी स्टार्ट बटन का क्लिक करावे लागते ?
१२] दोन शेजारणी खूप काम पडलंय अस म्हणत दारात उभा राहून अर्धा अर्धा तास का बोलत असतात ?
१३] जाहिरातीत दाढी केल्यानंतर गालावर हात फिरायला बाईचं का लागते ?
१४] अनुभवी डॉक्टर सुद्धा practice का करतात ?
१५] आपला जन्म इतरींसाठी झाला असेल तर इतर लोक कशासाठी जन्मले आहेत ?