नक्की वाचा खुप हसाल - एक अप्रतिम किस्सा !!
एके दिवशी वेदनांनी बेजार झालेला बंड्या डॉक्टरांच्याकडे कसाबसा गेला ....
.
.
बंड्या : डॉक्टर.... साहेब.. ..आह ..
पोटात ...... अग आई ग...
खूप... दुखतय...
आह ....
.
.
डॉ : अच्छा !! हे सांग शेवटचे जेवण कधी आणी काय जेवला होतास..?
.
बंड्या : जेवण नेहेमीचेच हो.. रोजच्या सारखे ....
.
डॉ : अच्छा अच्छा!! (२ बोटांची खूण करत )
इकडे शेवटचं कधी गेला होतास ...?
.
.
बंड्या : रोजच प्रयत्न करतो पण....
पण.... होतच असे नाही... गेले तीन दिवस......
.
.
डॉ समजले याला ... constipation आहे...
.
डॉक्टर आत गेले आतून एक औषधाची बाटली ...
.
आणि सोबत एक कँल्क्युलेटर पण घेऊन आले ...
.
.
बंड्याला विचारले - घर किती दूर आहे तुझे ?
.
बंड्या : 1 km
.
.
डॉक्टरांनी कँल्क्युलेटरवर काही आकडेमोड केली व चार चमचे औषध काढून एका वाटीत ओतलं.
.
डॉ : वाहनाने आलास की चालत ?
.
बंड्या : चालत ..
.
डॉ : हं... जाताना धावत जा...
.
डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....
डॉ : घर कितव्या मजल्यावर आहे ?
.
बंड्या : तिसऱ्या मजल्यावर.
.
डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....
.
.
डॉ : लिफ्ट आहे की जिना चढून जाणार ?
.
बंड्या : जिन्याने ...
.
डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....
.
डॉ : आता शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दे...
घराच्या मुख्य दरवाज्यापासून टॉयलेट किती दूर आहे ?
.
बंड्या : जवळजवळ २० फुट..
.
डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर काही आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले........
.
व म्हणाले
आता माझी फी आधी दे..
मग औषधाचा हा डोस घे...
मग कुठेही न थांबता फटाफट घर गाठ...नंतर मला फोन कर....!
.
.
बंड्या ने तसंच केलं.......
अर्ध्या तासाने डॉक्टरांना बंड्याचा फोन आला ...
.
एकदम बारीक थकलेल्याआवाजात.........
.
डॉक्टर साहेब
औषध तर उत्तम, जालिम होत हो तुमचं. पण तो कँल्क्युलेटर ठीक करुन घ्या हो...
.
.
.
फक्त 10 फुटांनी हारलो ना मी......