थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

बघा कसे वागतात फेसबुकवरचे लबाड बोके !

प्रकार 1 ) - फेसबुवरचा लबाड बोका !!!!
सगळं गपचूप बघणार कोण काय पोस्ट टाकतोय . हा स्वतःला आवडले किंवा नावडले तरी प्रतिक्रिया देत नाही . फेसबुकवर याचे अकाऊंट बंद आहे असे त्याचे प्रोफाइल पाहणाराची 100% खात्री होते .

  

प्रकार 2 ) - हा एकदम शांत बोका सोबत मित्रांना सतत टॅग करुनच पोस्ट टाकून लाईक कमेंट किती येतात ते पाहतो . भरपूर लाईक कमेंटची हौस . त्यासाठी हजारात मित्र गोळा करत असतो .
 

प्रकार 3) - हा बोका कायम मैत्रीणींच्याच पोस्ट वर पडीक असतो . हा जणू तिच्याच पोस्टचा अधिकृत वक्ता . कायम तिच्याच वतीने कमेंट करत असतो . बाकी कुठेही नाही . केली तर खोचक कमेंट करतो .
 

प्रकार 4 ) - हा बहुरंगी बहुढंगी बोका !!!!
याच्यासाठीच मार्क झुकेरबर्गने फेसबुक चालू केलेय . हा फेसबुकवर हरएक तर्‍हेच्या पोस्टमधून आनंद मजा टाईमपास करत फिरत असतो . लहरी असल्याने समोरच्या दिसणार्‍या पोस्ट प्रमाणे घडीत हसतो क्षणात गंभीर तर कधी चिडतो तर कधी भावूक होतो . कोणाचीही पोस्ट लाईक शेअर कमेंट करतो फक्त त्याला आवडायला हवी .