Faltupana.in - मराठी मजेचे माहेरघर - आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे !!
Home » » लोकांनी विचारलेले फालतू प्रश्न आणि त्याला दिलेले हटके उत्तर

लोकांनी विचारलेले फालतू प्रश्न आणि त्याला दिलेले हटके उत्तरअनेकदा लोकं असे प्रश्न विचारतात जे अतिशय मुर्खपणाचे असतात...
अशा प्रश्नांना दिलेली ही हटके उत्तर आहेत. पहा काही मस्त नमुने दिले आहेत:-

▶1) हॉटेल मध्ये अनेक जण वेटरला'इथे जेवण कसं मिळतं'हे विचारतात....
आता तो काय वाईट मिळत म्हणून सांगणार ? तरी असलाचएखादा
... इरसाल वेटर तर....गिर्हाईक: इथे पनीर मसाला चांगला मिळतो का हो ?

वेटर: छे !! बांधकामावरच सिमेंट आणुन कालवतो ते आम्ही त्यात...
कसला चांगला लागतोय................

▶2) प्रश्न- अरे वा! घरीच आहातवाटतं?
उत्तर- नाही माझ्या पश्चात ही इमारत"राष्ट्रिय वास्तु"घोषित झाली तर कसे वाटेल हे बघायला आलोय...............▶3) सकाळी.प्रश्न - पेपर वाचताय वाटतं!
उत्तर- नाही! ओल्या शाईचा (इंक) वास घेतल्या शिवाय मला ताजेतवाने वाटत नाही......

▶4) सिनेमागृहा बाहेर प्रश्न:काय पिक्चर बघायला आलात वाटतं?
उत्तर: छे! फावल्या वेळात तिकिटे"ब्लैक" करुन अर्थार्जन करावं म्हणतोय! पण!
इथेही तुम्ही आमच्या"आधी"हजर! !............

▶5) सकाळी फिरायला निघाला आहात प्रश्न: काय"मोर्निंग वाक्"वाटतं??!!!
उत्तर: काही तरी काय! नगरपालिकेचं कंत्राट घेतलयमैलाचे दगड कुणी पहाटे
चोरून तर नेत नाही ना याची खात्री करतोय!!.............

▶6) प्रश्न- प्रवासाला निघालात वाटतं? (हातात लगेजबघून !!!!)
उत्तर- नाही हल्ली व्यायाम करायला सवड मिळत नाही ना!
शिवाय जिम चे पैसे ही वाचतात !!

Share this article :

+ comments + 1 comments

4 January 2013 at 22:19

hehehehe

Post a Comment

www.faltupana.in वर आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

 
Support : Copyright © 2016. Faltupana.in - All Rights Reserved
Proudly powered by www.krimsoft.com