थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

कहर असा पुणेरी दुकानदार प्रियकर - Pune Love



‎"एका तरुण आणि पक्का पुणेरी असलेल्या(म्हणजे ­?) दुकानदाराचे एका मुलीशी प्रेम जमले. पण त्याने त्याच्या प्रेयसीला पुढील अटींचे पालन करण्याची कडक सूचना केली:
१. दुकानात सारखे सारखे येवू नये
२. सारखा सारखा फोन करू नये
३. मिसकॉल देवू नये. मिसकॉल दिल्यास माझ्याकडून फोन येण्याची अपेक्षा ठेवू नये.
४. फोनवर अथवा प्रत्यक्षात बोलताना आपले म्हणणे थोडक्यात मांडावे, उगीच पाल्हाळ लावू नये. प्रेम व्यक्त करायला दोन शब्द पुरेसे असतात. अबोल प्रेम तर फारच चांगले.
५. दुपारी २ ते ४ या वेळेत फोन करू नये.माझी वामकुक्षीची वेळ असते. झोपमोड झाल्यास आपल्या संबंधात बिघाड निर्माण होवू शकतो.


६. आमच्याकडे पाणी देण्याची पद्धत नाही, तेंव्हा दुकानात आल्यावर पाणी मागू नये
७. सुट्टीच्या दिवशी आपण फिरायला व जेवायला बाहेर एकत्र जावू शकतो, पण खर्च TTMM (तुझा तू माझा मी ) करावा लागेल.
८. वरील अटी मान्य असतील तरच पुढील वाटचाल करावी.

गम्मत म्हणजे या अटी वाचून त्या मुलीस तो दुकानदार आणखीनच आवडायला लागला, कारण "तीही पक्की पुणेकर होती"