हद्दच पार झाली गणिताची.. मराठी धम्माल - Faltupana.in

Faltupana.in

Funny images, Jokes, Article, Marathi Graffiti. आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ..

Loading...

वाचकांची पसंद :

Post Top Ad

Post Top Ad

हद्दच पार झाली गणिताची.. मराठी धम्मालआता तर हद्दच पार झाली गणिताची...😂😂😂
गणित विषयामध्ये सुञे पाठ होण्यासाठी *उखाणा* उपक्रम.
१) महादेवाच्या पिंडीसमोर
उभा आहे नंदी
आयताचे क्षेञफळ =
लांबी x रूंदी.

२) हिमालयातील काश्मिर
म्हणजे भूलोकातील स्वर्ग,
चौरसाचे क्षेञफळ म्हणजे
बाजूंचा वर्ग.
३) देवीची ओटी भरू
खणानारळाची,
ञिकोणाचे क्षेञफळ =
१/२xपायाxउंची.
४) स्वातंञ्याची पहाट म्हणजे
१९४२ ची चळवळ,
(सहा बाजू) वर्ग.....
हे घनाचे पृष्ठफळ
५) तीन पानांचा बेल त्याला
येते बेलफळ
लांबीxरूंदीxउंची..... हे
इष्टिकाचीतीचे घनफळ.
६) जुन्या हजार पाचशेच्या
बंद झाल्या नोटा,
खरेदी वजा विक्री
बरोबर होईल तोटा
७) मी आणि माझे विद्यार्थी
दररोज खातो काजू ...
चौरसाची परिमिती =
4 × बाजु.
८) खोप्यात खोपा
सुगरणीचा खोपा
विक्री वजा खरेदी
बरोबर होईल नफा
९) दहा किलो म्हणजे
एक मण...!!
घनाचे घनफळ
बाजूचा घन....!!
१०) *जीवाला जीव देतो तोच खरा मित्र*
*गणित सोडवायला माहिती हवीत सुत्र*
११) सम आणि व्यस्त हे
चलनाचे प्रकार
पहिल्यात असते गुणोत्तर
तर दुसर्यात गुणाकार
१२) "गोड" म्हणजे "स्वीट"..
"कडू" म्हणजे "बीटर"..!!
एक घनमीटर म्हणजे..
एक हजार लीटर....!!!!
१३) रविवार नंतर सोमवार
येतो,
रविवार नंतर सोमवार
येतो.....
प्रत्येक ऋण संख्येचा
वर्ग ...
नेहमीच धन होतो.
१४)महादेवाला आवडते
बेलाचे पान...
कोणत्याही ञिकोणात
एक बाजू...
दोन बाजूच्या बेरजेपेक्षा
लहान....!!😊
१५) दोनचा वर्ग चार.... !!
चार चा वर्ग सोळा.... !!!!
गणिताचे उखाणे
घ्यायला,
ग्रुप झाला गोळा.
😂😜😂😜😂😜😂😜
👀 *सवडीने वाचणार त्याला आवडीने पाठवणार*

Post Top Ad

Loading...