TRAVEL GUIDES

थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

आय पी एल क्रिकेट आणि नवरा बायको

Priya Bapat Umesh Kamatबायको :- अहो , हा ब्रेट ली आहे का….?
नवरा (हसून) :- नाही ग, हा ख्रिस गेल
आहे ...ब्रेट ली बॉलर आहे
बायको :- अरे वा …. दोनविकेट
एका पाठोपाठ
एक …. !!!
नवरा :- नाही ग …. पहिलीच रिप्ले
दाखवत
आहेत ….
बायको :- काय आळशी प्लेयर आहे हा…
नुसता बघतोय बॉल कडे….
नवरा (कपाळावर आठ्या) :- अग तो प्लेयर
नाही , अंपायर आहे…
बायको :- मग आज
तरी जिंकतो का तुमचा इंडिया
नवरा (वैतागून) :- अगंदिल्ली मुंबई आहे
सामना …
बायको :- एका बॉल पाठी दोघे दोघे
पळताहेत वेडे
कुठले …
नवरा चिडून टी व्ही… बंद करतो ….
बायको पुन्हा लाऊन
रडक्या डेली सिरियल पाहत
बसते …
नवरा :- अग ती रडणारी मुलगी कोण
ग….
बायको :- हे बघा गप बसा , मला शांत
पणाने
पाहू द्या …..