थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

जे आपल्या माथाडी कामगाराला जमले ते जर्मन तंत्रज्ञांना सुद्धा जमले नाही.......आपण जीवनामध्ये शिक्षण म्हणजे शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षण एवढेच काय ते मनात धरून असतो पण कधी कधी हे सर्व शिक्षण न घेतलेले लोक सुद्धा आपल्या अनुभवाने आणि जीवनाकडे बघणाच्या दृष्टिकोनाने असा काही चमत्कार घडवू शकतात कि ज्याने अनेक न सुटणाऱ्या समस्या ह्या एका सरशी मध्ये सुटू शकतात ...
असाच काहीसा अनुभव आला आहे मुंबई मध्ये ..
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एका कंपनीच्या ईमारतीच्या तळ्घरात एक अवाढव्य यंत्र उतरवायचे होते......त्या काळात ते यंत्र पेलणारी मोबाईल क्रेन नव्हती. मुंबई पोर्ट कडे तशा क्रेन होत्या पण फिक्स्ड होत्या. ऐन पावसाळ्याच्या दिवसात ते यंत्रच प्रचंड मोठ आणि महागड  जर्मनी मधुन मागवले होते....
माथाडे कामगाराणी ओंडक्यांच्या मदतीने ते ट्रेलर वरुन उतरवल......पण ते तळघरात ३६ फुट खोल ढकलायचे कसे यावर जर्मन आणि भारतिय तंत्रज्ञ खल करीत बसले होते.....अखेरीस जम्शेदपुर वरुन क्रेम मागवायचे असे ठरले.....पण त्यासाठी किमान २ आठवडे ईतका तरी वेळ लागणार होता.......
माथाडे कामगारांच्या टोळीचा कंत्राटदार ही मजा पाहत होता....तो म्हणाला
''साहेब मला आणी माझ्या माणसांना कशापायी ईथे थांबवुन थेवलय.....?''
त्याला सगळी परिस्थीती समजावून सांगितल्यावर तो चटदीशी म्हणाला
''हत्तीच्या....!!! एवढंच  ना ....? मी सोडुन दाखवतो यंत्र खाली....''
इंजिनियर म्हणाले एवढे सोपे नाही राव ते....जर्मन प्रमुखांनीही सुरुवातीला हसण्यावारीच नेल....एवढे भले भले  इंजिनियर डोक खाजवतायत तिथे हा अडाणी माथाडी कामगार काय करणार....???
पण त्याचा कॉन्फीडन्स जोरावर होता...त्याला गमतीनेच ती ऑफर देण्यात आली....निदान त्यच्या डोक्यात काय आहे ते जाणुन घेण्यासाठी,,,,,
कंत्राटदाराने एकाच वेळी आईस फॅक्टरीमधुन ५-६ ट्रक बर्फ मागवाला...आणि तो तळ्घरात ढकलून दीला....
आणि खडा बर्फाने भरुन घेतला.....मग ओंडक्यावरुन ते यन्त्र ढकलत त्या बर्फावर आणले....आणि एकाबाजुने पाणी बाहेर काढण्यसाठी पंप सुरु ठेवला.....जस जसा बर्फ वितळत राहीला तस तस त्याने पंपाने पाणि बाहेर काढता राहिला...आणि हळु हळु यंत्र खाली जात राहिल.....
ही साधी युक्ती आपल्याला का नाही सुचली म्हणुन् तो जर्मन डोक्याला हात लावुन बसला......
Source: Facebook