TRAVEL GUIDES

थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती
१. फेसबुक कोंबडा : यांना वाटते कि रोज सकाळी ,”गुड मोर्निंग”ची पोस्ट टाकावीआणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे.
२. फेसबुक सिलीब्रीटी : हे फेसबुक ने दिलेली ५००० ची लिमिट पूर्णवापरतात आणि खूप सारे अनोळखी लोकाना अड्ड करत सुटतात.

३. फेसबुक बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .
4. फेसबुक चोर : हे लोक दुसर्यांचे स्टेटस किवा पोस्ट चोरी करून , पटकन आपल्या नावावर टाकतात.
५ . फेसबुक देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता टाकतात. आणि आपले दुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.

६. फेसबुक न्वूज रीडर : जागत काय चालू, ह्या न्वूज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्वूज सांगत सुटतात.
७. फेसबुक टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुसर्याच्य ा चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. जसे पोस्ट जुनी आहे, पोस्ट जमली नाही वगैरे वगैरे.
८. फेसबुक विदुषक : हेलोक त्यांच्या आयुष्यात किती पण दुख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवतअसतात.
९. फेसबुक लाईकर : हे लोक गुपचूप पोस्ट वाचून लाईक करतात. पण कमेंट करायला कधीयेत नाही.
१०. फेसबुक कमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.
११. फेसबुक विचारक : हे लोक चांगले चागलेविचार आपल्यापोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याच ा प्रयत्न करतात.
१२. फेसबुक कवी आणि कवियित्री : याना कविता सोडून काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.
१३. फेसबुक टपोरी : हेलोक फेसबुक वर येतातच मुली पटवायला. दिसली मुलगी कि उठ सुठ फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात. आणि कमेंट करत असतात. आणि मुलींच्या मागे लागतात.
१४. फेसबुक द्वेषी : ह्या लोकांना फेसबुक वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकानाचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात.
१५. फेसबुक च्याटर : यांना फेसबुक वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,
१६. फेसबुक भिकारी : या लोकांची फ्रेंड रिक्वेस्टब्लोक असते म्हणून उठ सुठ मला अड्ड करा म्हणूनलोकांना भिक मागत फिरत असतात.
१७ . फेसबुक लिंग परिवर्तक: हे लोक वेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत असतात. मुल मुलीचे प्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.
१८. फेसबुक खेळाडू : हे लोक दिवसभर फेसबुक वर गेम्स खेळत बसतात.

१९. फेसबुक माकड : हे कमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा …….. हि हि करत असतात.
२० . फेसबुक कलेक्टर :हे फक्त फेसबुक वर पेज आणि ग्रुप जाईन करतात पण कधी पोस्ट किवा कमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असतात.
आणि तुम्ही यातील कोणत्या वर्गात मोडता….. ………. इकडे कमेंट करा.