Dance Bar आता सुरु होणार त्या प्रित्यर्थ रमलेल्या बाबाची कहाणी... (संदिप खरे यांची माफी मागुन)
दणादणा वाजणारी रीमिक्सची गाणी
आणि मध्ये नाचणारी गोड परीराणी
ग्लासामध्ये दारू त्यात बर्फ आणि पाणी
एका डान्स बारची ही रोजची कहाणी
ऐकवतो ऐक माझ्या सानुल्या फुला
रमलेल्या बाबाची या कहाणी तुला....
आटपाट नगरात गर्दी होती भारी
राजा करी रोज एका डान्स बारची वारी
कधी अपराधी राजा फोनवर बोले
काल रात्री घरी यायचे राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला घरी
कुशीमध्ये होती माझ्या बारमधली परी
स्वप्नातल्या गावामध्ये मारून आलो फेरी
सांगू नको आईला ती पडेल येऊन घेरी
काल झाला होता माझा झुलणारा झुला
रमलेल्या बाबाची या कहाणी तुला !
ऑफिसात उशिरा मी असतो बसून
पार्ट्या येती तेव्हा माझा हफ्ता घेऊन
एक एक येतो जातो हळूच निघून
हळू हळू ड्रॉवर सारा जातो की भरून
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे
हलकेच हसू माझे ओठांतून दाटे
वाटे मला उठावे अन दुकानात जावे
तिच्यासाठी गळ्यातले महागडे घ्यावे
उगाचच रुसावे नी भांडावे तिच्याशी
हलक्या हाताने चेन बांधावी गळ्याशी
करावी सोन्याने वाटे मला तिची तुला
रमलेल्या बाबाची या कहाणी तुला !
नकळता कशी मला लागली चटक
गळ्यात पडली एक भवानी भटक
काय करू आता मला कळेनासे झाले
लफडे भलते माझ्या गळ्याशी की आले
अडकून पडलो मी मोठ्या भोवर्यात
हात पाय मारूनही निघालो खोलात
काही वर्षांनंतर बाळा, तू ही मोठा होशील
एक वचन मागतो मला आत्तापासून देशील?
खूप शीक, मोठा हो, नोकरी धंदा कर
याद राख डान्स बारात गेलास जरी तर
एवढा एक सल्ला माझा ऐक माझ्या मुला
रमलेल्या बाबाची या कहाणी तुला !