थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

दिवाळी निमित्त कडक पुणेरी सूचना Pune Diwali Warning !!

Save Girl in India
Save Girl in India


कृपया दिवाळीच्या शुभेच्छा कमीत कमी शब्दात द्याव्यात.
उगीच लांबड लावू नये.

अलंकारिक भाषा वापरून आमचा वेळ घालवू नये.
सरळ मुद्यावर यावे.

फटाके न उडविण्याविषयी प्रबोधन करू नये.

दिवाळीच्या दिवसांचे महत्च सांगणारे पोस्ट टाकू नये.
आम्हाला माहीत आहे.

मुकेश अंबानींच्या घरील दिवाळीचे फोटो टाकू नका.
आम्हाला कौतूक नाही.

सण साजरा न करता दान धर्माचे आवाहन करू नका.
आम्ही तो वेगळा करतो.

मागील वर्षीच्या पोस्ट चालणार नाहीत....

👑हुकुमावरून...!