TRAVEL GUIDES

थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

फेसबुक देवाची आरतीजयदेव जयदेव जय फेसबुक देवा
कृपा असावी अपुली करतो मी सेवा
जयदेव जयदेव.....
दर आठवड्याला मी स्टेटस बदलवतो
दिवसाला एकदोन फोटो, लोडही करतो
वेळ काढून मौलिक chatting मी करतो
चांगले मित्र मजसाठी मग राखून ठेवा
जयदेव जयदेव.....रोज मैत्रीच्या एकदोन पाठवून रीक्वेष्ट
ओळख त्याची माझी आणतो घडवून
जरी न जाने देवा मी व्याख्या मैत्रीची
निर्बुद्धी समजून मजला ठेवा पाठीशी
जयदेव जयदेव.....
असेल जेथे तेथील, माहिती पुरवितो
"आय एम एट हिअर", असे ब्रीदवाक्याच करतो
तुझ्याच साठी मोबाईलवर "जी पी आर एस" ठेवतो
परवडेना तरीही खर्च दरमहिन्याला करतो
जयदेव जयदेव.....
खऱ्या टवाळपणाला येथे रे वाव
काही म्हणती हि तर ज्ञानातच भर
जगातील ज्ञानाचा तू उगम खरा
म्हणून करतो देवा नित्य तुझा धावा
जयदेव जयदेव.....
जयदेव जयदेव जय फेसबुक देवा
कृपा असावी अपुली करतो मी सेवा
जयदेव जयदेव.....


रचना: रुपेश बक्षी