थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

कोल्हापूर आणि पुणे - दोन्ही भारी

Pune Kolhapur Bus Shivneriकोल्हापूर आणि पुणे (दोन्ही भारी)
**********************************
कोल्हापूर : मैत्री भारी
पुणे : हिशोबात भारी
कोल्हापूर : पायाची काळजी घेते (चप्पल फ़ेमस)
पुणे : डोक्याची काळजी घेते (पगडी फ़ेमस)
कोल्हापूर : ऐतिहासिक
पुणे : वैज्ञानिक
कोल्हापूर : जागृत महालक्ष्मी
पुणे : जागृत दगडूशेठ


कोल्हापूर : पैलवानांचे घर
पुणे : विद्येचे माहेरघर
कोल्हापूर : दादासाहेब फाळकेंची नगरी
पुणे : प्रभात स्टुडियो ची नगरी
कोल्हापूर : रंकाळ्याची सुंदर सायंकाळ
पुणे : खडकवासल्या ची सुंदर सायंकाळ
कोल्हापूर : जिभेला तृप्त करणारे जेवण
पुणे : पोटाला शांत करणारे जेवण
कोल्हापूर : शाहू महाराजांचा दानशूरपणा
पुणे : बाजीराव पेशव्यांचा दिलदारपणा
आणि
आणि
कोल्हापूर : खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी
पुणे : हुशारीने बोलून मारतात कल्टी