थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

"युवा नेता" होण्याची प्रक्रिया - Young Leader Of India





आवश्यक सामग्री:-
१. SUV २५-३० लाखाची.
२. पांढर्या रंगाचे कुर्ते व पायजमे, लिनेनचे पांढर्या रंगाचे शर्ट.
३. २-३ सोन्याचे चैन व अन्घ्ठ्या.
४. २ आय-फोन
५. woodland चे बूट
६. ५-६ "होय साहेब, ठीके साहेब" करणारे चेले.

प्रक्रिया:-
१. आपल्या नंबर प्लेटच्या जागी आपल्या "पार्टीच्या" झेंड्याचा चिन्ह लावा व आपले ५-६ चेले सदैव SUV बसवून ठेवा. 
२. SUV मध्ये बसल्यावर मोबाईल हा उगाच कानाला लावून ठेवावे.
३. आपल्या देहाला नेहमी सोन्याच्या चैन आणि अंगठ्यांनी सुशोभित करावे.
४. संधी मिळेल तेव्हा कोणत्या हि एक नेत्याच्या माघे पुढे करण्याची "संधी" गमवू नये व त्यांची "सेवा-पूजा" करत रहावी. आपल्या नेत्या सोबतच, त्यांच्या नेत्यांची हि "चेले" गिरी करत फोटो कडून आपल्या घरात व "ऑफिस" मध्ये लावावे.
५. आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी "सामाजिक कार्यक्रम" घेत राहावे.
६. प्रत्तेक सणवारला, कार्यक्रमाला, वाढदिवसाला पूर्ण शहराला "फ्लेस" ने सजवून टाकावे.
७. मेडियाच्या लोकांसोबत "सेटिंग" करून आपले फोटो वर्तमान पत्रान मध्ये छापत रहावे.
८. वेळोवेळी पोलिस चौकीत "माझं नाव संग रे त्याला" असे उपदेश देणे.

घ्या! तयार आहे तुमचा "युवा नेता"