आचार्य अत्रेंचा झक्कास किस्सा
एकदा *आचार्य अत्रे* दादरला *मामा काणेंच्या* हॉटेलात *बटाटावडा* खायला गेले. खाऊन झाल्यावर त्यांनी ग्लासमधील पाण्याने प्लेटमध्येच हात धुतले.....
मामा काणेंनी ते गल्ल्यावरुन पाहिले आणी त्यांना राग आला, एवढा मोठा प्रसिध्द माणूस, पण शिस्त नाही, येऊ देत गल्ल्यावर पैसे द्यायला, त्यांना बरोबरच करतो...!
अत्रे गल्ल्यापाशी पैसे द्यायला आल्यावर...
मामा काणे - *तुम्हीच अत्रेच ना...?*
अत्रे - *हो... का बरे..?*
मामा - *तुम्ही कधी ताज हॉटेलमध्ये जेवला आहात का..?"*
Loading...
अत्रे - *हो, जेवलोय की.*
मामा - *जेवल्यानंतर तेथे कधी ताटात हात धुतलेत काय..?"*
अत्रे (बेरकीपणाने) - *हो...*
मामा - *मग तिथला वेटर तुम्हाला काहीच बोलला नाही....?*
अत्रे - *हो, बोलला ना...!*
मामा - *काय म्हणाला तो...?*
अत्रे - *तो म्हणाला, अहो मिस्टर, ताटात हात धुवायला हे काय मामा काणेंचे हाॅटेल आहे काय..?*