थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

दारू पिण्याची नियमावली आली आहे .. तातडीने शेयर कराल

 
नियमावली सापडली लक्षात असू द्या....
१) नेहमी उच्च प्रतीची दारू प्यावी.
२) दारू नेहमी कट ग्लासमधेच प्यावी. कुठल्याही साध्या बियर  वगैरेच्या ग्लास मध्ये व्हिस्की पिऊ नये.… प्लास्टिक किंवा स्टील च्या ग्लास मध्ये दारू पिऊ नये, कारण दारू आणि पिणारा दोघांचाहि त्यात अपमान आहे.
३) दारूमध्ये एक बोट बुडवून हवेत शिंतोडे उडवण्याचा येडपटपणा करून आपली लायकी देशी दारूची आहे असे
समोरच्याला भासवून देऊ नका… या सर्व अंधश्रद्धा आहेत हे लक्षात ठेवा.
४) शक्यतो दारू पिताना चकली, चना दाल, मुंग दाल, वेफर्स, सेंग, इ. सारखे वारंवार येणारे चखना पदार्थ टाळावे त्याऐवजी शक्यतो चीजक्यूब, चीझ्लींक, सलाड, किंवा नोनवेज मध्ये फ्राईड पदार्थहि उत्तम पण लिमिट मध्ये असावे.
 
 ५) बर्फाचे जास्तीत जास्त दोनच तुकडे उत्तम, (टीप – on the rox मारणार्यांनी फक्त पेग आणि ग्लासभर बर्फ
घेतल्यासहि चालेल.)

६) स्टार्टर (मिसळवण्याची दांडी) असायला हवी (जर एखादा त्या दांडीची वाट न पाहता direct पेग पीत असेल तर तो भिकार** आहे असे मानावे.)

७) जर तुमच्यातील एखादा दारू सोबत हावरटासारखा चखणा जास्त खात असेल आणि तुम्हाला काही चखणा ठेवत नसेल तर पुढच्या दारूच्या पार्टीला आपण त्याला आमंत्रण देऊ नये. लक्षात ठेवा दारू पिताना जो चखणा जितका कमी खातो त्याला पिणार्‍यांमध्ये तितका जास्त मान मिळतो.
दारू प्यायला बसण्याचा उद्देश हा गप्पा मारणे हा असावा चखणा खाणे हा नाही.

८) मध्ये कुणी कितीही घाई केली तरी मेनकोर्स हा दारू संपल्यावरच मागवावा मध्ये जेवण मागवू नये… जेवण शेवटीच करावे.…. आणि विशेषत: सिगरेट. … सिगारेट पिणार्यांनी आधी सिगारेट न पिणार्‍यांची परमिशन घेऊनच सिगारेट पेटवावी अन्यथा जर इतरांना त्रास होत असेल तर बाहेर जाऊन सिगारेट ओढावी.

९) दारू पिण्यात कोटा, Stamina वगैरे सगळ्या फालतू गोष्टी आहेत… त्यामुळे एखाद्याने नाही म्हटल्यास त्याला आग्रह करू नये आणि कधीही पिण्यामध्ये शर्यत लावू नये, आणि कधीही लेडीज सर्विस, डान्स बार या गोष्टींना बळी पडू नये ते फक्त एक भावनिक गुंतागुंतीचे आकर्षित करणारे मायाजाल आहे.

१०) दारू पिल्यावर जर एखादा भावनिक होत असेल किंवा “तू माझा भाऊ-दादा”, “तुझ्यासाठी कायपण” वगैरे सारखे फालतू डायलॉग मारत असेल किंवा राडा करत असेल तर त्याच्या तोंडावर सोडा मारा … आणि पुढच्या वेळी त्याला टाळा. … थोडक्यात आपल्या स्वभावामध्ये पिल्यानंतर विलक्षण परिवर्तन होते अशांसोबत बसू नये.

१२) दारूची किंमत हि वाढलेली असल्या कारणाने बजेटचा विचार करूनच प्यायला बसावे एखादा आपल्याला पाजतोय म्हणून अधाशासारखे पीत सुटू नये त्याच्या खिशाचाहि विचार करावा, कधी ९० तर कधी जास्तीत जास्त १ Quarter बस आणि शक्यतो थांबावे.… लक्षात ठेवा तुम्ही “टाकी” आहात याची
समोरच्या व्यक्तीला भनक लागू देऊ नका नाहीतर तुम्हाला आमंत्रणे यायची बंद होतील.…. महागाई वाढली आहे हे लक्षात ठेवा.

१३) जशी दिलेली दारूची आमंत्रणे आपण आनंदाने स्वीकारतो तसेच इतरांना आपण आमंत्रणे आनंदाने दिलीही पाहिजेत. दारू हि आलेले क्षण आनंदाने उपभोगण्यासाठी आहे… तिचा आनंद घ्या उपहास करू नका, इमोशनल होऊ नका, उलट्या करू नका, लफडे, राडे करू नका, आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा, गाडी व्यवस्थित चालवा आणि सुखरूप घरी पोहचा.