TRAVEL GUIDES

थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

नव्या पिढीचा लाकुडतोड्या
लाकूडतोड्याची गोष्ट सर्वांनाच माहित असेल...
तसंच काहीसं एकदा झालं...
चम्प्या त्याच्या बायकोबरोबर जंगलात जातो..आणि त्याची बायको तलावात पडते.
तो रडत असतो इतक्यातएक देवी येते..
तो देवीला सगळी कहाणी सांगतो..
देवी पाण्यात जाते आणि येताना कॅटरीना घेऊन येते..
देवी - हीच आहे का तुझी बायको?
चम्प्या - हो हो हीच आहे..
देवी - खोटं बोललास तर तुला शिक्षा देईल..
चम्प्या - देवी मला माफ कर..मी खोटं बोललो..
देवी - का बोललास खोटं...आता तुला शिक्षा देणार मी..
चम्प्या - माफ कर देवी.. मी जर कॅटरीना ला नाही म्हणालो असतो..तर तू करीना घेऊन आली असतीस..आणि मी तिलाही नाही म्हणालो असतो तर तू मला माझी बायको दिलीअसतीस..

आणि मी बायकोला हो म्हणालो असतो तर तू माझ्यावर खुश होऊन मला तिन्ही बायका दिल्या असत्यास..
मी खूप गरीब आहे..मला एकच परवडत नाही...३ कधी परवडणार?
देवी - अब रुलायेगा क्या पगले... घेऊन जा जा कॅटरीना ला..
मॉरल - माणसं इमानदारीने गेम खेळतात..