थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

बिल गेट्स बद्दल - हे वाचा झोप लागणार नाही...!! .




१) बिल गेट्स हा प्रत्येक सेकंदाला यु.एस.$ २५० कमावतो, म्हणजेच दिवसाला यु.एस.$ २० मिलियन, आणी यु.एस.$ 7.8 बिलीयन दर वर्षी…!
२) बरं जर समजा याच्या हातुन जर १ हजार डॉलर हरवले तर हा माहाभाग तेशोधण्याचाही प्रयत्न करणार नाही,कारण येत्या चार सेकंदांनी हा ते कमाउन बसलेला असेल…!
३) याने जर १५ डॉलर जगातल्या प्रत्येक व्यक्तीस देउन दिले, तरीही याच्या खिशात यु.एस.$ ५ मिलियन इतकी रक्कम उरलेली असेल.
४) अमेरिकेत मायकाल जॉर्डन हा सर्वात जास्त पैसे कमावणारा खेळाडु आहे. जर याने आयुष्यभर काही न खाता-पीता आपले वार्षीक उत्पन्न वाचवले जे की ३० मिलीयन डॉलर इतके आहे, तरिही त्याला बिल गेट्स इतके श्रीमंत होण्यासाठी, २७७ वर्षे वाट पाहवी लागेल.
५) समजा बिल गेट्स हा जर एखादा देशअसता, तर जगातला ३७ वा श्रीमंत देश होण्याचा मान याने पटकावला असता.
६) विचार करा जर बिल गेट्स ने आपलापैसा १ डॉलर च्या नोटांमधे रुपांतरीत केला, तर तो चंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनउ शकतो. तेही एक रस्ता नाही, असे २८ रस्ते तो बनउ शकतो. पण हा रस्ताबनवायला १४०० वर्ष लागतील, आणी तेही जवळपास ८००, बोइंग ७४७ विमानांचा वापर करावा लागेल पैसापोहचवण्यासा ठी.


७) बिल गेट्स आता जवळपास ५४ वर्षांचा झाला आहे, ग्रुहीत धरा तो आणखी ३५ आणखी जग़ेल, जर पुर्ण संपत्ती खर्च करायची असल्यास, वेळात त्याला दर दीवशी जवळपास ७ मिलियन डॉलर खर्च करवे लागतील.
आता शेवट:
८) मायक्रोसॉफ्ट ही प्रणाली वापरणार्या जगातल्या प्रत्येक माणसाने, जेव्हाही त्यांचा संगणककाम करायचा थांबल्यास(म्हणज ेच हॅंग झाल्यास) जर फक्त १ डॉलर इतका दावा मायक्रोसॉफ्ट या कंपनिवर केला, तर फक्त ३ दिवसांच्या कालावधीत बिल गेट्स चे दिवाळे नीघेल.