TRAVEL GUIDES

थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

पप्पू यादव चे मृत्यूपत्र


Pappu Yadav Train
Pappu Yadav

मृत्यू पत्र
.
जसलोक हॉस्पिटलच्या ICU मध्ये पप्पू यादव, पिंकी नर्स ला बोलावून सांगतो.. की बाहेर वेटिंग रूम मध्ये माझी दोन मुले, मुलगी आणि पत्नी बसलेले असतील

तू त्याना घेवून ये आणि त्यांच्या शेजारी थांब, मला मृत्यू पत्रावर साक्षीदार म्हणून तुझी सही हवी आहे.

मोठ्या मुला कडे बघून म्हणतो... तुझ्यासाठी जुहू ची सी विंड टोवर ठेवली आहे
दुसर्या मुला कडे बघून.... खार जिमखान्याच्या बाजूची ओपल टोवर तुला
मुलीला जवळ घेवून ... सांताक्रूझ पश्चिमेची आयेशा टोवर तू घे....
.
आणि बायको कडे बघून म्हणतो... आपण मुंबईत राह्यला आलो तेंव्हा, ज्या पार्ल्याच्या चाळीत रहात होतो... ती तुझी...
.
पिंकी नर्स, पप्पू यादवच्या बायकोचा हात हातात घेवून म्हणते... "बघा तुमच्या श्रीमंत नवर्यानी, इस्टेटीची किती चांगली वाटणी केली आहे."
.
त्यावर पप्पू यादव ची बायको म्हणते...
"अहो ही सर्व आमची इस्टेट नाही..."
"आम्ही ज्या ठिकाणी रोज दुध पुरवतो, त्या बिल्डींग्स ची याने वाटणी केली आहे....."