थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

"सैराट" ने वेडे झालेल्या लोकांसाठी वेगळा वॉर्ड सुरु


केळकर मेंटल हॉस्पिटल, पुणे

येथे "सैराट" ने वेडे झालेल्या लोकांसाठी वेगळा वॉर्ड सुरु. खालील पैकी कोणतीही लक्षणे तुमच्या आसपास च्या लोकांमध्ये असल्यास स्पेशल वार्ड चा लाभ घ्या.

लक्षणे :

१. सतत सैराट बद्दल पोस्ट्स करणे.

२. Director किती महान आहे हे गावाला सांगत सुटणे.

३. प्रत्येक गाण्याचे लिरिक्स पाठ असल्याचे म्हणून दाखवणे.

४. अकलूज गावामध्ये आपले पाहुणे राहतात हे दुसर्यांना सांगणे.

५. सैराट ची गाणी मोठ्याने मोबाईल वर लावणे.

६. आरची वर तिच्या वयाचा विचार न करता गरजेपेक्षा जास्त लाईन मारणे आणि आपण तिच्यासाठी किती लायक उमेदवार आहोत याचा एकांतात विचार करणे.

७. करमाळा गावातील विहीर बघायला जाऊया म्हणून ट्रिप काढायचा विचार करणे.

८. नागनाथ मंजुळे आणि स्टिव्हन स्पीलबर्ग यांची तुलना करणे.

९. सैराट ची रोजची कमाई किती यांचा हिशेब वहीत लिहून ठेवणे.

१०. गुप चे नाव "सैराट" ठेवणेे

११. आर्ची व परस्याची फोटो डीपी ला ठेवणे

१२ . फेसबुक वर " सैराट " विषयीच्या माहिती शेअर करणे व लाईक करणे .

१३. सैराटची गाणी मोबाईल वर रिंगटोन म्हणून ठेवणे.

१४. फिल्म मधील प्रत्येक कॅरेक्टरचा ईतिहास भूगोल सांगत सुटणे.