थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

गायछाप या विषयावर सविस्तर निबंध
प्रश्न -- "गायछाप''  या विषयावर  सविस्तर निबंध लिहा.
गुण १५


उत्तर-- 
 "गायछाप'' हे एक नैसर्गिक खाद्य आहे,
गायछाप मुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
भारतात दर १० व्यक्तींमागे ३ माणसे गायछाप  खातात.
मध्य महाराष्ट्रात तर दर १० मागे ९ जण गायछाप  खातात.

गायछाप खाणे ही एक कला समजली जाते, वडिलधा-या माणसांना सन्मान देण्यासाठी गायछाप दोन मिनिटे मागे लपवून ठेवावि. तरी त्यांच्या लक्षात आल्यास ते मागण्याची शक्यता असते. गायछाप घोटणे  हे सुद्धा अतिशय कलात्मक काम समजले जाते,
गायछाप शिवाय जीवन अपूर्ण आहे,


सध्या गायछाप सर्वत्र मिळते आगामी काळात माँल मध्ये सुद्धा मिळेल,

गायछाप न खाल्यास मन अस्वस्थ होते, तसेच शौचास होत नाही,

गायछाप कुठेही लपवून ठेवता येते  तसेच उधारीवर कोणीही देऊ शकते.

गायछाप शेअर करणारे लोक अतिशय पक्के मित्र असतात,

गायछाप मुळे तन मन प्रफुल्लित होते,खाणा-याच्या भाषेत सांगायचे म्हटलं तर "करंटच लागत नाही " ब्रम्हानंदी टाळी लागते.

गायछाप खाणारी माणसे अतिशय हुशार आणि विद्वान असतात,

एकदा का गायछाप ताेंडात गेली ....
साक्षात् परमेश्वर जरी अमृत घेऊन आला तरी गायछाप थुंकली जात नाही. त्याला सुद्धा "आत्ताच गायछाप खाल्ली  प्रभु " हेच उत्तर मिळते.

पानटपरीवर गायछाप खातांना ईतर गायछाप प्रेमीकडुन जी माहीती मिळते ती जगातल्या कुठल्याही विश्वकाेषात मिळत नाही.

गायछाप खाल्ल्यावर कुणी कुणी आस्वाद घेताना जे माैनव्रत पाळतात तेव्हा ते खुप वर पाेचलेले तपस्वीच वाटतात.

कट्टर गायछाप खाणारा सहसा बिडी, सिगरेट, पान, असले वाईट व्यसन करीत नाही. कमी खर्चीक असलेली गायछाप फक्त १० रुपयांत मिळते,

घे भाऊ डबल.....
😄😄😄😄😄😄😄👏

गुण १५ पैकी १५।