थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

हिम्मत असेल तरच वाचा !!

ashi hi banwa banwi


एक माणूस मुंबई हून पुण्याला गाडी घेऊन निघाला होता.
त्याने विचार केला कि आपण जुन्या रस्त्याने जरा निसर्ग बघत जावूया. तो ज्यावेळी डोंगरावर
पोहोचला त्यावेळी त्याची गाडी बंद पडली.
तो आता अश्या ठिकाणी होता जिथून त्याला काहीही जवळ न्हवतं.
थोड्याच वेळात अंधार पडला आणि पाऊस सुद्धा चालू झाला.
रात्रपुढे सरकत होती पण त्या रस्त्याने कोणी सुद्धा जात न्हवतं.
... ... अचानक एक गाडी त्याच्याकडे येताना त्याला दिसली.
त्यांनी काही विचार न करता गाडीत पाठीमागच्या सीटवर बसला आणि धन्यवाद
करण्यासाठी तो पुढे सरकला. आणि पाहतो तर काय?


समोर कोणीच नाही..पण गाडी मात्र चालत होती. गाडी सरळ चालायची आणि वळणावर ज्यावेळी असे
वाटायचे कि आता गाडी धडकतेय त्या वेळी अचानक एक हात खिडकीतून समोरून
यायचा आणि गाडी वळवायचा. 


तो खूप घाबरला. त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. देवाकडे सतत  प्रार्थना करू लागला.
अचानक एका वळणावर त्याला एक उजेड दिसला. गाडी हळू झालेली पाहून पटकन गाडीतून
उतरला आणि सरळ त्या उजेडाकडे धावत सुटला. तो एक छोटा धाबा होता.
धाब्यावर जावून पाणी प्याला आणि तो सर्व लोकांना त्या खतरनाक अनुभवाबद्दल सांगू लागला.
धाब्यावर गाढ शांतता पसरली…


आणि इतक्यात संता आणि बंता तेथे आले. संता त्या माणसाकडे बोट दाखवून बंताला म्हणाला
'हाच बघ तो वेडा जो आपल्या गाडीत बसला होता ज्यावेळी आपण ती ढकलत होतो