फेकिंग न्यूज - सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही काय ? गाणाच्या चाहत्यांसाठी नवीन वार्ड सुरू करा - मागणी
आज काल जिथे जाल तिथे 'सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही काय ?' ह्या गाणाच्या व्हाट्सएप्प आणि फेसबुक पोस्टने हैराण झालेल्या तुम्हा आम्हासारख्या काही नेट युजर्सने ठाण्याच्या मेंटल इस्पितळमध्ये सदर सोनू वेड्यांसाठी विशेष वार्ड सुरू करायची मागणी केली आहे ...
त्या मागणीला सोनू निगम,सोनू सुद,सोनू कक्कर आणि तारक मेहता फेम सोनू भिडेने सहमति दर्शवली आहे ..
प्रसिद्ध गायक सोनू निगम ह्यांनी एक गाणे रेकॉर्ड केल्यावर जेव्हा आपल्या गाण्याची विदागीसाठी फिल्म प्रड्यूसरला मेसेज केला तेव्हा त्याने सोनू निगम ह्यांना सोनू तुझा माझ्यावर भारवसा नाही काय ? हा मेसेज परत पाठवून चकरा मारायला लावले म्हणून ते अत्यंत संतप्त आहे आणि आपले नाव बदलायच्या विचारात आहे ...
सोनू नाव बदल दर्शवणार्या शेकडो नोटीसी वर्तमान पत्रा मध्ये सध्या झळकतांना दिसतं आहे .. अनेक तरुण मुले आणि मुली आपले नाव सोनू का ठेवले म्हणून आई-बाबांना जाब विचारतांनाचे खात्रीलायक वृत्त आहे ...
ह्या प्रश्नावर अभ्यास चालू आहे आणि लवकरच हयातून मार्ग निघेल असे आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे ... लवकरच ह्या मोहिमेला यश मिळेल अशी अशा करू !